
वाळुज महानगर, (ता.25) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकात असलेल्या एका बियर बार समोर अंदाजे चाळीस वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी आढळून आला. या मृताची ओळख पटली नसल्याने त्याचा मृतदेह घाटीतील शीतग्रहात ठेवण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौक, भोंडवे पाटील बार च्या समोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 40 वर्ष वयाचा इसम बुधवारी 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत मिळुन आला. पोलीस अंमलदार मंगेश जाधव यांनी त्यास उपचारकामी घाटी दवाखाना येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या मयताची ओळख पटली नसल्याने त्याचे प्रेत शवाग्रहात ओळख पटवण्यासाठी ठेवलेले आहे.
मयत अनोळखीचे वर्णन असे –
वय अंदाजे 40 वर्षे, नाव पत्ता माहित नाही. रंग- सावळा, चेहरा- निमुळता, डोळे- काळे, केस वाढलेले काळे-पांढरे, नाक- सरळ, अंगाने सडपातळ, उंची- अंदाजे 5.5 फुट, दाढी मिशी वाढलेली, अंगात दोन शर्ट एकमेकावर घातलेले, वरून चॉकलेटी रंगाचा शर्ट, त्याच्या खाली पिवळ्या रंगाचा शर्ट, हिरवट रंगाची पॅन्ट घातलेली. असे त्याचे वर्णनआहे.या अनोळखी मयत इसमाबाबत काही एक माहिती प्राप्त झाल्यास वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व पोलीस हवालदार आर. एस. तांदळे यांनी केले आहे.
