
वाळुज महानगर, (ता.20) – पतंजली योग समिती बजाजनगर आणि संभाजीराजे जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराला औताडे स्मार्टसिटीत योगाप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन मुख्य मार्गदर्शक जनार्दन नवसरे दादा तसेच सुभाष औताडे, कृष्णकुमार जयस्वाल आणि योग मार्गदर्शक यांनी दीप प्रज्वलन व भारत मातेचे पूजन करून केले. याप्रसंगी जिल्हा सह प्रभारी अंकुश भानुसे यांनी परिसरातील नागरिकांना बहु संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्या. आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हान केले.

या योग शिबिरात पहिल्या दिवसाची योग सेवा डॉ. शैलेश माकणीकर, अंकुश दादा भानुसे यांनी आपल्या अमृत योगवाणीने सर्वांमध्ये उत्साह भरला. त्यांना कल्पना मानकर, लता दवंगे, तानाजी सरडे. लक्ष्मण शिंदे, देविदास चंदापुरे, दिलीप सोनवणे, कल्याण तवले यांचा सहभाग मिळाला.
