वाळूजमहानगर, (ता.27) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस बजाजनगर येथील ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ट्यूशन शिवाय दहावीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले.
यशाचे शिखर गाठत 25 मुलांनी 90 टक्के पेक्षाही जास्त गुण तसेस प्रत्येक विद्यार्थ्यांने अतितटीची स्पर्धा करून 145 विद्यार्थ्यांनी 70 टक्के पेक्षाही जास्त गुण संपादित करून घवघवीत यशासहित 100 टक्के निकाल राखला.
शंतनू खुराडे, आकांक्षा उबरहंडे, नागेश पवार यांनी संस्कृत मध्ये 100 टक्के गुण व अर्पिता गोर्डे हिने गणितामध्ये 100 गुण प्राप्त केले. शंतनू खुराडे व ऋतुजा म्हसे यांनी 95 टक्के गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. श्रद्धा मोगरे व आदित्य खेसे यांनी 94.20 टक्के गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला. महेश
वारे 93 टक्के, मयूर शेंडगे 92.60, अथर्व शिगते, अलिशा गजभिये, गौरव ससेमल यांनी अनुक्रमे 92.40 गुण प्राप्त केले. तसेस श्रेयश वसमतकर 92.20, रुपाली पवार 92 टक्के, साहिल काळे 91.60, आकांक्षा आवटे, धनश्री कदम यांनी अनुक्रमे 91.40 गुण प्राप्त केले. प्रणव देशमुख, कृष्णा आहेर यांनी प्रत्येकी 91.20, सोहम रावले, शुभम पोळ, प्रज्ञा जगदाळे, वेदिका शिंदे यांनी अनुक्रमे 90.80 गुण प्राप्त केले. ओम देशमुख, बुद्धभूषण सोनवणे 90.60, सार्थक पाटेकर 90.40 व प्राची रेडे, कौतुक गायकवाड, दिया शेवाळे, पृथ्वीराज डिंगरे यांनी प्रत्येकी 90 टक्के गुण संपादीत केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक तसेच पालक यांनी स्वागत केले.