March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस बजाजनगर येथील ऑर्किड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ट्यूशन शिवाय एसएससी परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले. यशाचे शिखर गाठत आनंद ख़ुशी मृन्तुजय व बैनाडे शिवानी लालचंद यांनी 95.20 टक्के गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला.


बैनाडे शिवानी लालचंद हिने संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले, लोंढे गायत्री राजेश व लोखंडे पूजा उत्तमराव यांनी 94.80 टक्के, संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला. दातरंगे समीक्षा बाळासाहेब 94.20 संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. तसेस बागडे ओम प्रशांत 93.60, दाभाडे आर्यन पांडुरंग 93.60, आदमाने विवेक रत्नाकर 92.80, भोसले आर्यन समाधान 92.80, बिलाल प्रणव चैतन्य 92.40, दळवी सुहानी सिध्दार्थ 92.40, गायकवाड आचल संजय 91.20 गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *