वाळूजमहानगर, (ता.13) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बजाजनगरमधील ऑर्किड टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी वाटचाल कायम ठेवत सी.बी.एस.ई. दहावी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

या परिक्षेत 10 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहे. यात अवजारे समीक्षा रवींद्र हिने 96 टक्के संस्कृत विषयात 100 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक मिळवला. अथर्व विजय दहिफळे 95 टक्के, गुंजाळ जयदीप गणेश 93.80 टक्के, पांडेय मेहेक मीतुन्जय 93.60 टक्के, ताठे शुभम दादासाहेब 93 टक्के, देशपांडे देवयानी योगेश 93 टक्के, गायकवाड दिशा संतोष 90.80टक्के, पिन्प्रतीवार वैष्णवी कल्याण 90.60 टक्के, आणि राऊत निर्मोह राजेंद्र 90.20 टक्के यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी तसेच पालक यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

