
वाळूजमहानगर, (ता.9) – बजाजनगर मधून ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या विद्यार्थ्यांनी 2022 मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत एकूण 4 विद्यार्थी युवराज पदमसिंग मेहेर -265, ख़ुशी विश्वनाथ चौरसिया-239, रोहित संजय भट्टड-225 आणि सीमा गणेश सुरासे – 200 गुण मिळवून मराठवाड्यातून उच्च निकाल संपादन केला. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यशाचा पाठ पुरावा करून अभिमानास्पद यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ऑर्किड संस्थेच्या वतीने चेअरमन श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांनी कौतुक केले.
