
वाळूजमहानगर, (ता.5) – वाळूज महानगर येथील ऑर्किड जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये झालेल्या जेईई मेन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत एकूण 11 विद्यार्थी उतीर्ण झाले. यात मंगेश प्रशांत शिंपी याने 99 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. देवेंद्र हरिशचंद्र मातकर- 98.72 टक्के, कल्याणी किशोर गाडे- 97 टक्के, ओमकार छोटूराम कुऱ्हाडे – 93.5 टक्के, चेतन जनार्धन निकम 92 टक्के, श्रीनंद मनोहर बांद्रे- 91 टक्के गुण मिळवून उच्च निकाल संपादन केला. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यशाचा पाठपुरावा करून अभिमानास्पद यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ऑर्किड संस्थेच्या वतीने चेअरमन, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेस भावी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
