वाळूजमहानगर, (ता.21) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनस बजाजनगर येथील ऑर्किड जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठत सायन्स आणि कॉमर्स दोन्ही शाखेत नेत्रदिपक यश संपादन केले.
सायन्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखेचा 100 टक्के निकाल लागला. यात म्हस्के श्रेया 92.50 टक्के गुण प्राप्त करून पहिला क्रमांक मिळवला. शेषान हरिणी 92.33 टक्के गुण प्राप्त करून दूसरा क्रमांक मिळवला,
मुचक आदित्य 91.17 टक्के गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. पवार नम्रता 88.17 टक्के, पाटील प्रथमेश 87.33 टक्के, मतकर देवेंद्र 87 टक्के, सोनार गायत्री 86, लोधी पियुष 85.33, पेरे चैतन्य 84.17 गुण प्राप्त केले. ऑर्किड ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.