February 5, 2026

 

वाळुजमहानगर (ता.3) – व्हेरॉक उद्योग समुहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 17 व्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या संघांनी दमदार विजयासह आपली घोडदौड कायम ठेवली. या लढतींमध्ये प्रेम कासुरे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील व्हेरॉक उद्योग समूहाच्या वतीने
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या क्रिकेट स्पर्धेत ऑर्किड ग्रुप आणि गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यातील सामना एकतर्फी झाला. यात गायकवाड ग्लोबल स्कूल संघाला 17.1 षटकात अवघ्या 72 धावांवर रोखून ऑर्किड ग्रुप संघाने सामन्यावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर ऑर्किड ग्रुप संधाने अवघ्या 4.5 षटकात बिनबाद 72 धावा फटकावत 10 विकेटने सामना जिंकला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात स्वयंम वाघमारे याने अवघ्या 15 चेंडूत 40 धावांची शानदार खेळी साकारली. त्याने 1 चौकार व 5 टोलेजंग षटकार मारले. प्रेम कासुरे याने 16 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. त्याने 5 चौकार व 1 षटकार मारला. तन्मय याने 2 चौकारांसह 12 धावा काढल्या. गोलंदाजीत प्रेम कासुरे याने 10 धावांत 3 विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. साईराज आखाडे याने 25 धावांत 2 गडी बाद केले. अभिषेक घटविसवे याने 20 धावांत 2 विकेट घेतल्या. यापूर्वी झालेला राजा शिवाजी विद्यालय यांच्यातील सामना सुद्धा एकतर्फी झाला होता. ऑर्किड स्कूलच्या संधाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 1 बाद 200 असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले होते. या सामन्यात देखील प्रेम कसुरे सामनावीराचा मानकरी ठरला होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *