March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर येथील रहिवासी क्षेत्रात असलेल्या गणेश विसर्जनस्थळी गणेश विसर्जन करण्यात येत असून एमआयडीसी प्रशासनाकडून या विहिरीची व परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

वाळूज अग्निशमन केंद्रात गेले पाच दिवस गणेश उत्सव साजरा करण्यात आला. या गणेश मूर्तीचे रविवारी 31 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास या विहिरीत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी गणेशमूर्तीची ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळापर्यंत मिरवणूक काढली. त्याचप्रमाणे एक, दीड, तीन, पाच दिवस असा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबाने या विहिरीवर गणेशमूर्तीचे विसर्जन केले. गणेश विसर्जन स्थळा विषयी माहिती देताना एमआयडीसीचे उपअभियंता गणेश मुळीकर यांनी सांगितले की, गणेश उत्सव सुरू होताच या विसर्जनस्थळाची एमआयडीसीने स्वच्छता केली. या विहिरीतून गाळ काढून केर कचरा साफ करण्यात आला आहे. तसेच परिसरात वाढलेली झाडी झुडपे तोडून परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. हे वाळुज औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीचे एकमेव गणेश विसर्जनस्थळ आहे. येथे बजाजनगर व औद्योगिक क्षेत्रातील शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन दरवर्षी करण्यात येते. शनिवारी 6 रोजी दहा दिवसाच्या गणेश उत्सवाची सांगता होत असून या दिवशी या विसर्जनस्थळी मोठी गर्दी होईल. यामुळे आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *