February 5, 2026

 

वाळूज महानगर, (ता.21) – औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन वाळूजजवळ फुटली. त्यामुळे उंचच उंच फवारे उडत असून परिसरातील व्यावसायिक आणि वाहनधारक त्रस्त होत आहे. शिवाय लाखो लिटर पाणी सुद्धा वाया जात आहे.

वाळूज औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्यासाठी ब्रह्मगव्हाण जल उपसा केंद्रपासून वाळूजच्या जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन केलेली आहे. ही पाईपलाईन मंगळवारी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी वाळूजजवळ फुटली. त्यामुळे पाण्याचे उंचच उंच फवारे उडत आहे. या पाण्याचा फवारा पाहून पाण्याचा पाण्याचे कारंजा असल्याचा भास होतो.

त्यामुळे तो पाहण्यासाठी वाहनधारक रस्त्यातच थांबतात. या पाण्याचा उंच उडणारा फवारा छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर येत असून ते महामार्गावरील वाहन धारकांच्या अंगावर पडत आहे. त्यामळे वाहनधारक त्रस्त होत असून परिसरातील लहान मोठे व्यवसायिक त्रस्त होत आहे. शिवाय मंगळवारी आणि बुधवारी अशा दोन दिवसात लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

विशेष म्हणजे या फवाऱ्याचे उडणारे पाणी अंगावर येऊ नये, म्हणून अनेक वाहनधारक आपली मार्गिका सोडून दुसऱ्या मार्गिकेत जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाहनधारकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत असलेल्या या फुटलेल्या पाईपलाईनकडे एमआयडीसीचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. ही फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्ती करून परिसरातील व्यावसायिकांची व वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *