वाळूज महानगर, (ता.12) : आतून लावलेली घराची कडी उचकटून कपाटात ठेवलेल्या 41 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह 23 भार वजनाच्या चांदीचे दागिने व रोख तीस हजार रुपये असा जवळजवळ दीड लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही चोरीची घटना वाळूज येथे गुरुवारी (ता.10) रोजी सकाळी उघडकीस आली.
वाळुज येथील अण्णाभाऊ साठे नगरात राहणाऱ्या रंजना दिलीप दांडगे (वय 50) या कुटुंबासह झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाक घरातील दरवाजाची आतून लावलेली कडी उचकटून आत प्रवेश केला. व कपाटात ठेवलेले41 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 23 भार वजनाच्या चांदीचे दागिने तसेच रोख 30 हजार रुपये असा एकूण 1 लाख 54 हजार 600 रुपयाचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी (ता.10) रोजी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी रंजनाबाईच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.