
वाळूजमहानगर, (ता.16) – किरायाच्या घरात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.15) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे उडली.
रितेश सुखदेव गायकवाड 19 रा. शिक्षकनगर, रांजणगाव (शेणपुंजी) हा कुटुंबासह राहत होता. त्याने काहीतरी कारणाने ओढणीच्या सहाय्याने छताला बुधवारी (ता.15) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच रितेश याला बेशुद्ध अवस्थेत सुखदेव गायकवाड, नागनाथ गायकवाड यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
