
वाळूजमहानगर, (ता.23) – शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवून देण्यासाठी बँकांची शाळा या आंदोलना अंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातील पंढरपूर, बजाजनगर आणि माळीवाडा येथील राष्ट्रीय बँकांमध्ये जाऊन सोमवारी 23 जून रोजी बँकेची शाळा घेतली.

या आंदोलनात पीक कर्जाबद्दल आलेल्या अर्ज प्रकरणे निकाली काढली का?, शेतकरी – कामगारांना बँकांमध्ये योग्य ती वागणुक दिली जाते का?, सामान्य नागरिकांचे बँकेत व्यवहार सुरळीत होतात का? असे विविध प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तसेच बँकांना लेखी निवेदन देत येत्या 2 दिवसात निकाली लागलेल्या व प्रलंबित असलेल्या पीक कर्जाच्या यादीची मागणी करण्यात आली.
यावेळी पंढरपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा अधिकारी भगवान पाटील, डी. एम मोटे, लिपिक ए. व्ही. अली बजाजनगर, मोरे चौक येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे बँक व्यवस्थापक राजीव यादव, शाखा प्रबंधक शैलेश गुरभेले, क्षेत्र अधिकारी हर्षद कुलकर्णी तसेच माळीवाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक सोमनाथ सोळंके, सहाय्यक अधिकारी स्वप्नील जाधव यांना निवेदन देण्यात आले.
उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर, प्रभारी तालुकाप्रमुख विष्णू जाधव, शहरप्रमुख विशाल खंडागळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, बिबन सय्यद, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, विभागप्रमुख संतोष चंदन, सतीश हिवाळे, रोहिदास चव्हाण, रतन नलावडे, उपविभागप्रमुख लहू खराटे, कल्याण राकडे, संशोधन सावते, वैभव राठोड, तिसगाव विभागप्रमुख विनोद दाभाडे, उपविभागप्रमुख राकेश सक्सेना, यशवंत चौधरी, पवन दाभाडे, बाबासाहेब सोनटक्के, राजु बनकर, काकासाहेब चोपडे, माळीवाडा सरपंच विभागप्रमुख नंदकिशोर मुळे, रामु सुरासे, अंकुश कान्हेरे, उपसरपंच मनेश गाजरे, प्रविण बर्डे, गणेश काळे, शिवसैनिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
