वाळूज महानगर, (ता.30) – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावे. यासाठी दुसर्यांदा उपोषणास बसले आहेत. तसेच त्यांनी दसऱ्याच्या दिवशी चौंडी या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनस्थळी जाऊन जाहीर पाठिंबा देऊन समर्थन दिले.
या दोन्ही आरक्षणाच्या मागण्या मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असुन आरक्षण मिळावे. म्हणून न्यायालयीन लढा दोन्ही समाज बांधवानी लढून देखील आरक्षण आजतागायत मिळालेले नाही. म्हणून लोकशाही मार्गाने आपला हक्क मिळवण्यासाठी उपोषण करणाऱ्या मराठा व धनगर बांधवांना जाहीर पाठिंबा म्हणून नागेश किसनराव कुठारे यांनी उपसरपंच, तिसगाव ग्रामपंचायत पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देणाऱ्या मतदाराच्या सेवेसाठी मी यापुढेही तत्पर राहील. याची ग्वाही देत कोठारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्वरित आरक्षण देऊन मराठा व धनगर समाजास न्याय द्यावा. अशी मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रविण हाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दैवशाला कोठारे, तेजस बढे, शितल गंगवाल, नरेंद्रसिंग यादव, प्रताप भवर, जगदीश उगले, रमेश कंठाळी, गणेश जगताप, ज्ञानेश्वर मागे, दत्ता जाधव, साताप्पा दरपनकर, महेश वाघ उपस्थित होते.