March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – सिडको वाळूज महानगरमध्ये फिरणाऱ्या मोकाट गायीसाठी कोंडवाड्याची व्यवस्था व पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच मोकाट जनावरांचा जीव वाचवण्यासाठी या समस्येचा गांभीर्याने विचार करून तात्काळ तोडगा काढावा. नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

सिडको प्रशासनास दिलेल्या याबाबत एक निवेदनात असे म्हटले आहे की, सिडको वाळूज महानगर येथे 11 जानेवारी रोजी एका गायीचा उपचाराअभावी मृत्यु झालेला आहे. अशा घटना या परिसरात वारंवार घडत असुनही प्रशासन म्हणुन आपण काहीही काळजी घेत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. अनेकवेळा या मोकाट जनावरांमुळे लहान मोठे रस्ते अपघातही होत असतात. लंपीसारख्या भयानक आजाराने थैमान घातलेले असताना, या गंभीर समस्येवर उपाय म्हणुन सिडकोकडे काहीही व्यवस्था आजपर्यंत करण्यात आलेली नाही. हे कटुसत्यही प्रशासनाने मान्य करायला हवे. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे निष्पाप प्राण्यांची एकप्रकारे हेळसांड सुरू आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या समस्येचा गांभीर्याने विचार करून तात्काळ तोडगा काढावा. नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही या निवेदनाद्वारे शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी दिला आहे.
नवजात वासरू कुत्र्याने खाल्ले
सिडको वाळूज महानगर 1 पोलीस चौकी जवळ दोन दिवसापूर्वी एक गाय व्याली आणि तिचे जिवंत वासरू कुत्र्यांनी फाडून खाल्ले. तसेच गाईचा उपचारा विना तडफडून रस्त्यावरच मृत्यू झाला. वाळूज महानगरातील हा प्रकार खूपच वेदनादायी आहे. गोमाता आणि गोवंशाचे हे हाल थांबायला हवेत. त्यामुळे शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी सिडको प्रशासनास लेखी निवेदन देऊन मोकाट गायींसाठी कोंडवाडा तसेच उपचारासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *