
वाळुज महानगर, (ता. 2) – श्वास घेण्यास त्रास होत असल्याने घाटीत दाखल केलेल्या 20 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यानंतर तिचा पती मोबाईल फोन बंद करून घाटीतून फरार झाला. हा प्रकार गुरुवारी (ता.29) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील सविता सुधाकर हिवराळे वय, 20 वर्षे, हिस
रांजणगाव येथे गुरुवारी (ता.29) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास राहत्या श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तिचा पती सुधाकर भगवान हिवराळे याने घाटी दवाखाना अपघात विभागात आणुन दाखल केले. अपघात विभागात उपचार चालु असतांना त्याच दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास सविता ही मयत झाली. तिचा पती तिचे शव तेथेच ठेवुन मोबाईल फोन (नं. 980988 9230) बंद करुन तेथुन निघुन गेला आहे
असे आहेत महिलाचे वर्णन –
नाव – सविता सुधाकर हिवराळे वय, 20 वर्षे, रा. रांजणगाव (शे.पु.) ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर, रंग- गोरा, चेहरा- लांबट, डोळे- काळे, दोन्ही भवयाच्या मध्ये गोंदन, केस- लांब व काळे, नाक- सरळ, कानामध्ये कुडक व हुजुर, अंगाने सडपातळ, उंची अंदाजे चार 4 5 इंच, अंगात गुलाबी रंगाचा गाऊन.
ओळख पटलेली नाही –
या महिलेबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेचा पती तिला मृत अवस्थेत टाकुन मोबाईल बंद करुन निघुन गेला आहे. त्यामुळे या अनोळखी मयत महिलेची अध्यापक पर्यंत ओळख पटलेली नाही. तिच्या नातेवाईकाची व पतीचा शोधासाठी या महिलेविषयी कोणाला काहीही माहिती असल्यास तात्काळ वाळुज एमाडिसी पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
