
वाळूजमहानगर – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मसिआ ) च्या मुख्य कार्यालय चिकलठाणा येथील जागेत मसिआच्या उद्योजक सभासदांच्या सहकार्याने उभारलेल्या भव्य आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असेलल्या सभागृहाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी (ता.21) रोजी होणार आहे.
या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, बहुजन व इतर मागासवर्ग,सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ, आमदार रमेश बोरणारे, ‘एमएसीसीआयए’चे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांची उपस्थिती असणार आहे. अशी माहिती मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी दिली आहे. यावेळी संघटनेच्या चिकलठाणा येथील जागेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सांस्कृतिकः सभागृहाचे रत्नप्रभा बालासाहेब पवार सभागृह’ या नावाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.21) दुपारी 12.30 वाजता मसिआच्या चिकलठाणा येथे हा कार्यक्रम होणार असून, सर्व मसिआ सभासदांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन अध्यक्ष किरण जगताप आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. असे मसिआचे प्रसिद्धीप्रमुख दुष्यंत आठवले व सहप्रसिद्धी प्रमुख रवी आहेर यांनी कळविले आहे.
