February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.11) – उद्योगाच्या यशात मटेरियल मॅनेजमेंटला अनन्यसाधारण महत्त्व असून याच्या योग्य व्यवस्थापनासाठी कुशल मनुष्यबळ तसेच शास्त्रोक्त प्रणालीची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन यशश्री उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद कंक यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट (आयआयएमएम) च्या नूतन कार्यालयाचे तसेच उत्कृष्टता प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी रविवारी (ता.10) रोजी केले.


उद्योगांमध्ये उत्पादन गुणवत्ता या विभागांबरोबरच साहित्य व्यवस्थापन हा विभाग अत्यंत महत्त्वाचा असून याची योग्य प्रणाली द्वारे व्यवस्थापन केल्यास उद्योगांच्या नफ्यात लक्षणीय वाढ होते. हे त्यांनी यशश्री उद्योग समूहाचे उदाहरण देत स्पष्ट केले. आयआयएमएमने स्थापलेल्या ग्रंथालयाचे त्यांनी विशेष कौतुक करत नव उद्योजकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी संघवी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश संघवी यांनी आपल्या प्रगतीत आय.आय.एम.एम चा मोठा वाटा असून या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठवाडा ऑटो कॉम्पोचे संचालक तरुण उद्योजक मिहीर सौंदलगीकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत सर्व नवोद्योजक आय.आय. एम. एम बरोबर सहकार्य करतील तसेच शहरातील मध्यवर्ती भागात उभारलेल्या या अद्यावत केंद्राचा निश्चित उपयोग करतील अशी अशा व्यक्त केली. आय.आय.एम. एम औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सुशांत पठारे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाखेच्या 44 वर्षांचा आढावा घेत सर्व सभासदांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फनीकुमार मारेपल्ली तर आभार औरंगाबाद शाखेचे उपाध्यक्ष श्रीकांत मुळे यांनी मानले.

याप्रसंगी आय आय एम एम चे राष्ट्रीय सदस्य संजय संगाई, के. श्रीहरी, डॉ.नरेंद्र जोशी, जितेश गुप्ता, मासियाचे अध्यक्ष अनिल पाटील, सीएमआयचे प्रसाद कोकीळ, तणसुख झांबड, डॉ.अभय कुलकर्णी, आयसाचे राहुल जाजू, एमआयटीचे डॉ.संतोष भोसले तसेच प्रतिष्ठित उद्योजक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारस मुथा, सुधीर पाटील, ललित लोहाडे, रमेश जेऊरकर, अमेय कोलते, प्रेम कदम, सुनील सोनार, अभिजीत अद्वंत, सुशील पांडे, सुनील वेद, मिलिंद घोगले, सुदर्शन धारूरकर आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *