वाळूजमहानगर (ता.10) :- औरंगाबाद औद्योगिक क्षेत्र हे वाहनांचे सुटे भाग पुरवणारे क्षेत्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. या क्षेत्रात मायक्रो प्लॅनिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्योगाचा नफा हा कच्च्या मालाचा पुरवठा तसेच तयार मालाचा योग्य वेळेत पुरवठा यावर अवलंबून असतो. या क्षेत्रातील आव्हानांना संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. उद्योगाच्या प्रगतीसाठी पुरवठा साखळी नियोजन (सप्लाय चेन मॅनेजमेंट) हे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन ग्रीव्हज कॉटनचे उपाध्यक्ष प्रशांत नरवडे यांनी केले.
एस ए इ इंडिया औरंगाबाद विभागाच्या वतीने बुधवारी (ता.9) रोजी आयोजित ग्लोबल ऑटोमोटिव्ह सप्लाय चेन चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी या दोन दिवशीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नरवडे हे बोलत होते. ही परिषद मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी एसएई इंडियाच्या अध्यक्ष रश्मी उर्ध्व रेषे, संजय निबंधे, संयोजक रवी खारुल, नरहरी वाघ, डॉ.उल्हास शिवूरकर, डॉ. उल्हास शिंदे, एटी एस उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक एस रामनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेत संजय टेक्नो प्लास्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकीळ, अँड इंडियाचे रोहित शर्मा, एस एन पाणीग्रही एस्कॉर्ट हेल्थकेअरचे मोहन नायर, आयआयटी मुंबईचे डॉ. प्रशांत दाते, एन बी टेक्नॉलॉजीचे रवींद्र कोल्हे, एस एन जे बी चे संचालक डॉ. राजेंद्र तातेड, सुश्मिता नंदे, डॉ. शंकर वेणुगोपाल, बडवे इंजीनियरिंगच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, सलील पेंडसे, नितीन आठवले, डॉ. संतोष राणे आदी तज्ञांचे मार्गदर्शन झाले. गुरुवारी (ता.10) रोजी परिषदेत राजेश कृष्णन, अरुण कुमार संपत, नितीन आठवले यांचे पॅनल डिस्कशन होणार आहे. तसेच इ एंड्युरेन्स टेक्नॉलॉजीचे संजय संघई, गिरीश कोकणे, प्रसाद कोकीळ, ग्राइंड मास्टरचे समीर केळकर या तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेसाठी औरंगाबाद आणि पुणे येथील सुमारे दीडशे उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी संयोजक रवी खारुल, नरहरी वाघ, पवन चौधरी, सागर मुरुगकर, ओंकार देशपांडे, रमेश कुकरीजा, उल्हास शिंदे, डॉ. उल्हास शिवूरकर, डॉ. अनिरुद्ध निकाळजे, सुदर्शन धारूरकर आदींनी परिश्रम घेतले.