March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.7) – हॉटेलच्या पार्कीग मध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी उद्योगनरीतील तिरूपती हॉटेल जवळ गुरूवारी लंपास केली.
कैलास गायकवाड व गोपाल गायकवाड हे दोघे गुरूवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास दुचाकी (एम एच 20एफ ए -6817) ही तिरूपती हॉटेल समोर हॅन्ड लॉक करून जेवनासाठी मध्ये गेले होते. काही वेळाने जेवन करून पुन्हा तेथे आले असता, उभ्या केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. म्हणून तीचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोह गिरी करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *