March 23, 2026

बजाजनगरातील लोकमान्य चौक परिसरातील बाप्पा कॉम्प्लेक्स समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी यांनी अडीच हजार लाडू प्रसाद स्वरूपात वाटप केले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, सरपंच सुनील काळे, उपतालुकाप्रमुख कैलास भोकरे, विष्णू जाधव, सुदाम भंडे यांच्या उपस्थितीत प्रभू रामाचे पूजन करून महाआरती घेण्यात आली. महाआरती नंतर उपस्थित राम भक्तांना लाडूचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, काकाजी जिवरग, गणेश सूर्यवंशी, दत्तात्रेय वरपे, शिवाजी ढेपे, अमोल पोटे, सतीश शेवाळे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *