February 5, 2026

वाळूज महानगर – कोणताही सण उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचे सहकार्य असावे. म्हणून आपण त्या सण उत्सवाची कार्यकारिणी करतो. या कार्यकारणीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे सण उत्सवात सामाजिक सलोखाही राखला जातो. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलभैय्या चोरडिया यांनी केले.

बजाजनगर येथील विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात अनिल भैया चोरडिया ही बोलत होती यावेळी त्यांनी जनजागृतीसाठी सुरू झालेल्या गणेशोत्सवातून समाजप्रबोधन व्हावे. विद्यार्थी व कलाकाराच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच लेखक, साहित्यिक, कवी, नाटककार यांच्या भाषणांचे किवा कलागुनांचे मार्गदर्शन पर कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविले जावे. वक्त्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध करून, व्याखानमाला आयोजित केल्या पाहिजे. त्यांच्या अनुभवपर मार्गदर्शनातून नवीन पिढीला योग्य दिशा मिळू शकते. गणेशोत्सवातील देखाव्यांवर कमीत कमी खर्च करावा. देखावे हे सामाजिक जाणीव जागृती या विषयांवर असावेत. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलभैय्या चोरडिया यांनी केले. यावेळी चोरडिया दाम्पत्याने श्री गणरायाची आरती केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या ज्योती चोरडिया, आशिष पावडे, रवी म्हस्के, मंडळाचे अध्यक्ष अशोक डोमाटे, अशोकराव दोमाटे, लक्ष्मण गोसावी, दिलीपराव काकडे, जगन्नाथ आमले, संतोष कदम, विजय पोफळे, अनिल देसले, ज्योती दोमाटे, सुनिता कुलकर्णी, रोहिणी गोसावी, रोहिणी उभेदळ, कृष्णा मापारे, विनोद लव्हाळे, आशा लव्हाळे, रूपाली कदम, छाया काकडे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *