वाळूज महानगर –
वाळूज येथे गणेश महासंघ वाळूज तर्फे बैलपोळ्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेत 22 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी काढण्यात आलेली मिरवणूक रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होती.

शुक्रवारी 26 आगस्ट रोजी मारुती मंदिर जुने वाळूज गाव खांब नदी लगत वाळूज येथे सायंकाळी 5 वाजता शेतकरी आपल्याला सजवलेल्या बैलांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत 22 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सजवलेल्या बैलांची शिस्तबद्ध रित्या मिरवणूक काढण्यात आली. यात अनेकांनी आपापले कौशल्य, कला सादर केल्या.
यावेळी काठी फिरवण्याच्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या या मिरवणकीत चांगलीच रंगत आल्याने रात्री दहापर्यंत मिरवणूक सुरू होती.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाळुज गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन गायकवाड, अध्यक्ष भैय्या पठाण, उपाध्यक्ष नंदू सोनवणे, ललित राऊत, सचिव रतन अंबिलवादे, सह सचिव ज्ञानेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष सर्जेराव भोंड , सहकार्याध्यक्ष दीपक साबळे, संघटक नदीम झुंबरवाला सहसंघटक सचिन मुंढे, कोषाध्यक्ष विजय साबळे, सचिन पानकडे कार्यक्रमाचे व्यवस्थापक अविनाश गायकवाड प्रवीण अग्रवाल अनिल भुजंग, सल्लागार काकासाहेब चापे, माणिक राऊत, सचिन काकडे, पद्माकर जाधव आदींनी प्रयत्न केले आहे.