
वाळूज महानगर, (ता.9) – दिवसेंदिवस वाढत्या कचऱ्याच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाई केली. बुधवारी 9 जून रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर सुमारे 50 च्या वर नागरिकांकडून जवळजवळ 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 
रांजणगाव (शेणपुंजी) येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून उघड्यावर कचरा टाकला जात होता. परिणामी सर्वत्र अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकू नये, यासाठी अनेकदा नागरिकांना सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्यामुळे अखेर आज बुधवारी 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजता विभागीय आयुक्ताच्या आदेशानुसार भरारी पथकाने थेट रस्त्यावर उतरत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
रांजणगाव फाटा ते ग्रामपंचायत कार्यालयपर्यंत असलेल्या दुभाजकावर नागरिकांकडून रोज उघड्यावर कचरा टाकला जातो. त्यावर उपाय करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार भरारी पथकाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, तलाठी चंद्रभान माळी, ग्रामपंचायत अधिकारी गणेश पाटील धनवई, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रामचंद्र ठाकरे, जोगेश्वरीचे ग्रामविकास अधिकारी स्वप्निल घरमोडे, स्वप्निल जगन्नाथ, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ. योगिनी बाळंखे, घाणेगावचे ग्रामपंचायत अधिकारी जी एल बोळसेकर, पोलीस अंमलदार मंगेश मनोरे, एच डी अग्रवाल, पी पी तमलवाड, ए टी मनोरे आदीचा या भरारी पथकात समावेश होता.

पन्नास जणांवर कारवाई –
या पथकाने बुधवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह रांजणगाव फाटा, कमळापूर फाटा, गांधीनगर, देवगिरी कॉलनी, ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध पथके नेमून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या 59 पेक्षा जास्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत जवळपास 29 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.
यांचाही होता कारवाईत सहभाग –
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी दीपक पंडित, अंकुश गवारे, अर्जुन जाधव, सिद्धेश्वर मुळे, संतोष बोटवे, लहू गोरे, शशिकांत सुरवसे, सुनील वाकुडकर, संतोष जयस्वाल, अनिल वाकळे, नवनाथ शिंदे, राम काबरा, अरुण घुसळे, कलीम शेख, उमेश गवळी, वैभव देसाई, अशोक शिंदे, अरुण माळी, बाळू कुराडे, शिवाजी जाधव, देविदास जाधव, गंगाधर कुराडे, गोरख खाजेकर, सुरेश नितनवरे, बाळू चंद्रभान कुराडे, सुधाकर बोकन, गीता वाघ आदी कर्मचाऱ्याचा पथकात समावेश होता.
