वाळूजमहानगर, ता.1 (बातमीदार) – वीज बिलाची शक्तीने वसुली तसेच विमा कंपन्यांची दादागिरी. या विरोधात शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (ता.1) करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात वाळूज परिसरातील ईसारवाडी येथे फाटा येथे हजारो वाहनांचा चक्का जाम झाला. यावेळी कार्यकर्त्यांना आवरताना व वाहनांची कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
शेतकऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या विज बिलाची सरकारने सक्तीने वसुली करू नये. अतिवृष्टी व विविध कारणांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने त्रास देऊ नये. याबाबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भाजप व शिंदे सरकारवर खडसून आसूड ओढला.
यावेळी गंगापूर तालुकाप्रमुख दिनेश मुथा, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, लक्ष्मणभाऊ सांगळे, वाळूज येथील माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जयस्वाल, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर पाटील, विभाग प्रमुख बाळासाहेब चनघटे, शहर प्रमुख नंदकुमार राऊत, तालुकाप्रमुख मनोज पिंपळे, उपशहर प्रमुख संजय शिंदे, विश्वनाथ थोरात, अमोल बोंद्रे,
महेश पवार, सुखदेव गुंजाळ, अनिल सोनवणे, गणेश तुपे, सर्जेराव भोंड, तुषार थोरात, गणेश राऊत, जोगेश्वरीचे उपसरपंच प्रवीण दुबिले, विभाग प्रमुख रामदास गुळे,
पंढरपूरचे माजी उपसरपंच महेंद्र खोतकर, तीसगावचे माजी उपसरपंच विष्णू जाधव, कैलास हिवाळे यांच्यासह गंगापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान वाळूज पोलीस ठाणे व एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
…………..