वाळूज महानगर (ता.10) – छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवरिल ईसारवाडी फाटा येथे मंगळवारी (ता.10) रोजी दुपारी अपघात होवून तुकाराम ताकवले वय 51 आणि निर्मला तुकाराम ताकवले वय 46 हे मोटर सायकलवरून (एमएच 17, सी जे -9388) लोहगाव वरून गाढेगावाला जात असताना ईसरवाडी फाट्यावर गाडी स्लीप होऊन दोघंही जखमी झाले.
अपघाताची माहिती होताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची विनामूल्य अंबुलन्स अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.