वाळूजमहानगर, ता.8 – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच त्यांच्या कुटुंबीयास न्याय मिळवण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. या मागणी करिता वाळूज परिसरातील ईटावा ता. गंगापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात सरपंच कैलास डिगंबर शिनगारे, उपसरपंच आण्णा गोरखनाथ गांगर्डे, ग्रामपंचायत सदस्य रामकिसन कडूबा म्हस्के, नरसिंग रामसिंग माळी, कावेरी योगेश मुदीराज, वंदना बाबासाहेब घुले, सुवर्णा बबन गव्हाणे, रंजना बळवंत सुर्यवंशी, रूपेश किसन जाधव, सुनिता कैलास शिनगारे, ग्रामपंचायत अधिकारी आर. के. मुळे यांच्यासह ग्रामपंचायत लिपिक अमोल हिवाळे, कर्मचारी कृष्णा उगले, गणेश जाधव, अनिल कानडे, किरण पोटफाडे सहभाग घेणार आहे.