March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.30 – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्यंकट मैलापुरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 30 ऑगस्ट 2025 रोजी मोठ्या उत्साहात झाली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपाध्यक्ष विश्वनाथ शेळके, सचिव किशोर साळवे, संचालक अमृता डोंगरदिवे, मोहन वाघमारे, राजू लाघे, राजू सावळे, सरोज नरोटे, संतोष कोटकर आदी उपस्थित होते. या सभेत वार्षिक व आर्थिक अहवाल सादर करण्यात आले. मागील वर्षातील संस्थेची कामगिरी समाधानकारक असून, सदस्यांच्या ठेवी व कर्ज व्यवहारात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय संस्थेला झालेल्या नफ्याचा योग्य विनियोग करून सभासदांच्या हितासाठी विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

या सभेत संस्थेच्या सदस्यांनी आपले प्रश्न संचालक पदाधिकारी समोर मांडले, त्यामध्ये प्रामुख्याने मारोती कदम, सदाशिव केळकर, शिवाजी वाघमारे, दिलीप गायकवाड, ओमप्रकाश सोळंकी, पुनमचंद राठोड, दत्ता सूर्यवंशी, सखाराम गोळे, गणेश देशमुख यांची उपस्थित होते. तसेच सभेत संस्थेच्या पुढील वर्षातील कार्ययोजना, नवीन कर्ज योजना व सदस्याभिमुख उपक्रम यावर चर्चा झाली. डिजिटल व्यवहार व पारदर्शकता वाढविण्याचे ठराव एकमताने मंजूर झाले. अध्यक्षांनी आपल्या भाषणात सदस्यांचा विश्वास आणि कर्मचारी वर्गाचे योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात पतसंस्था आणखी सक्षम व सदस्याभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साह, शिस्त व समाधानाच्या वातावरणात यशस्वीरित्या झाली. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रफुल्ल कांबळे, अनिकेत सूर्यवंशी, गोरख सुदरक, ज्ञानेश्वर गव्हाणे आदींनी परीश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *