March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.13) – समाजातील अनाथ, भिक्षेकरी व लैगिक शोषण ग्रस्त मुलांच्या डिजिटल शिक्षणासाठी वाळुज औद्योगिक वसाहतीतील इप्का फाउंडेशनच्या वतीने “टीव्ही सेट” भेट म्हणून शनिवारी (ता.13) रोजी देण्यात आला.

समाजातील अनाथ, एकल पालक, कैद्यांची मुले, भिक्षेकरी व लैगिक शोषण ग्रस्त मुलांचे शिक्षण, संस्कार व संगोपन व्हावे. या उद्देशातून अजित फाउंडेशन ही संस्था काम करते. महेश निंबाळकर यांनी शाळेतील मुलांनां सध्याच्या डिजिटल शिक्षणासाठी उद्भवत असलेले खंत इप्का लॅबोरेटरीजचे मानवसंसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडामार्फत टीव्ही सेट मंजूर करून त्याचा धनादेश शनिवारी (ता.13) रोजी इप्कालॅबोरेटरीजचे साईट हेड संजय चौबे व कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थित अजित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश निंबाळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

यावेळी गिरीधर गायकवाड, देवदत्त कुलकर्णी, अमर बोराटे, एकनाथ पवार, नानासाहेब गायकवाड, प्रफुल्ल कांबळे, दिनेश आंबोटकर, मोहन महाजन आदी कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी अजित फाउंडेशन विद्यार्थ्यांना कसे घडवत आहे हे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ग्राफिक्स व व्हिडिओच्या मध्यमातून पाहून त्यांच्या कार्याची स्तुती केली. व भविष्यात शाळेला भेट देऊन शक्यती वैयक्तिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

सामाजिक कार्यासाठी सोडली सरकारी नोकरी –
बार्शी जिल्हा सोलापूर येथील महेश व विनया निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेची शिक्षकी पेशाची नौकरी सोडून हे सामाजिक काम हाती घेतले आहे. ते अजित फाउंडेशन या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून मागील 16 वर्षांपासून वंचित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *