वाळूजमहानगर (ता.29) :- महावीर ट्रस्ट औरंगाबाद संचलित महावीर फाउंडेशन अंतर्गत चालणाऱ्या महावीर डायग्नोस्टिक सेंटरला इप्का फाउंडेशन तर्फे 51 लाख रुपयाची अत्याधुनिक मशनर इप्का फाउंडेशनचे कमलेश जैन, इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड औरंगाबाद प्लांटचे युनिट हेड संजय चौबे, मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापूरे यांच्या हस्ते 27 नोव्हेंबर रोजी सुपूर्त करत मशीनचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी इप्का फाउंडेशनचे कमलेश जैन म्हणाले की, आम्ही अद्यावत मशीनरी सह्याद्री डायग्नोस्टिक व सेंटरची आवश्यकता पाहून व त्याचे मागील समाजासाठी केलेले काम पाहून त्यांना ही मशीन देत आहोत. त्यांनी या मशीनच्या माध्यमातून गरजवंताची सेवा निरंतर चालू ठेवावी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय महासचिव सी.ए. अनिलकुमार जैन हे होते. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महावीर इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय मीडिया संचालक रमेशचंद बाफना, झोन चेअरमन राजकुमार जैन, झोन सेक्रेटरी सतिश चोपडा, विकास पाटणी हे होते. या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गरजवंतांना 35 ते 40 टक्के कमी दरात सर्व तपासण्या करून मिळतील असे ठोले यांनी प्रस्ताविकात सांगितले. त्यासाठी गरजूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री डायग्नोस्टिकचे डॉ. सन्मती ठोले यांनी केले. तर जी.एम. बोथरा यांनी आभार मानले.