वाळूज महानगर, (ता.6) – घरासमोर उभी केलेली 18 लाख रुपये किंमतीची टोयोटा इनोव्हा कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही चोरीची घटना गुरुवारी (ता.5) रोजी रात्री एक ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान सिडको वाळूज महानगर -2 येथे घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर 2 येथील विजय रामनाथ गडगूळ (32) हे भांड्याचा व्यापार करतात. त्यांची 18 लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा कार (एम एच 20, एफ वाय – 3591) ही गडगुड यांनी घरासमोर उभी केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता.5) रोजी रात्री 1 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान लंपास केली. ही चोरीची घटना सकाळी उघडकीस येताच विजय गडगूळ यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोरपडे करीत आहे.