
वाळूजमहानगर, (ता.6) – वाळूज परिसरातील इटावा ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी मंगळवारी (ता.6) रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेत अण्णा पाटील गांगर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी एस डब्ल्यू वाघ यांनी काम पाहिले.

विटावा ग्रामपंचायतचे उपसरपंचपद रिक्त असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंगळवारी (ता.6) रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी इटावा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ठरलेल्या वेळेत उपसरपंच पदासाठी अण्णा पाटील गांगर्डे यांचा एकमेव अर्ज आला. तो वैध ठरला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष अधिकारी यांनी घोषित केले. या निवडणुकीत सरपंच कैलास शिनगारे, वंदना बाबासाहेब घुले, रामकिसन कडुबा म्हस्के, नरसिंग रामसिंग माळी, अण्णा गोरखनाथ गांगर्डे, सुवर्णा बबन गव्हाणे, रुपेश किसन जाधव, रंजना बळवंत सूर्यवंशी, सुनिता कैलास शिनगारे यांनी सहभाग घेतला. तर कावेरी योगेश मुदीराज या गैरहजर राहिल्या. या निवडणूक प्रक्रियेत मंडळ अधिकारी एस डब्ल्यू वाघ, तलाठी संदीप पवार यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे यांनी सहकार्य केले. उपसरपंचाची निवड जाहीर होताच ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने अण्णा गांगर्डे यांचे स्वागत करण्यात आले.
