
वाळूज महानगर, (ता.23) – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या ऑर्किड टेक्नो स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेडली गणपती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून आकर्षक व मानभावक साकारलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वतः घरी स्थापन करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. 
बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूलच्या वातीने नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ऑर्किड टेक्नो स्कूलमध्ये पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. 
तसेच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या गणेशमूर्ती स्वतः घरी स्थापन करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. सध्याच्या काळात प्रत्येकाने निसर्गाचे संवर्धन व संतुलन राखने गरजेचे आहे. 
याच हेतूने शाळेमध्ये शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती विद्यार्थ्यांच्या हस्ते बनवून विद्यार्थी मूर्तिकार बनले व मूर्तिकरांच्या कलेचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी यांनी मांडले. 
कार्यशाळा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका तसेस शिक्षेकतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
