वाळुज महानगर – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इंडीयन टुल गणेश मंडळाच्या वतीने याही वर्षी गणपतीची स्थापना करून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. या गणेशोत्सवात व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते व गुणवंत कामगार प्रदिप माळी यांनी व्यसनमुक्तीपर पोष्टर प्रदर्शन भरवून कामगार व गणेश भक्तांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले.
याशिवाय संतोष डुमने यांनी देशातील व विदेशातील नोटा व नाणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच विजय वैद्य यांच्याकडुन गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सत्कार करून महाप्रसाद देण्यात आला. कार्यकामाच्या यशस्वीतेसाठी इंडियन टुल गणेश मंडळाच्या कार्यकारणीत प्रकाश गवळी (अध्यक्ष), प्रदिप माळी (उपाध्यक्ष), दयानंदा पानकोरे (कोषाध्यक्ष), तर सलागार म्हणून एस.एस.जाधव, दिगंबर शिंदे, संजय गोकोंडे, ख्रिस्तोफर गायकवाड, दामोदर सोळंके, बि वाय मांडवे, विलास बांगर, के.के जाधव, बी जी साळुके, विजय अंत्रे, तसेच सदस्य रामदास तरटे, ज्ञानेश्वर डोरले, पुंजाराम हिवाळे, प्रकाश गोधने, अनिता साबने, मधुकर श्रावणे आदीनी परीश्रम घेतले.
.
