
वाळूज महानगर, (ता.5) – आषाढी एकादशी निमित्त वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात दरवर्षी येणाऱ्या दिंडीचे स्वागत व फराळाची व्यवस्था हा स्तुत्य उपक्रम वाळूज लिंबे जळगाव दरम्यानच्या के टी संगम इन्फ्रास्ट्रक्चर या टोल व्यवस्थापनाच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून राबविण्यात येतो. 
मराठवाड्यातील प्रति पंढरपूर म्हणून वाळूज परिसरातील वळदगाव पंढरपूर ओळखल्या जाते. येथे आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते. त्यासाठी मराठवाड्याच्या अनेक गाव शहरांमधून पंढरपूर येथे विविध दिंड्या येतात. अशीच एक दिंडी
घोडेगांव (श्री क्षेत्र घोडेगांव (शनिचे) ते श्री क्षेत्र पंढरपुर (वळदगांव ता.जि.संभाजीनगर) ही दिंडी
पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गाने येत असते.
या दिंडीतील भाविकांचे स्वागत तसेच चहा, पाण्याची व्यवस्था वाळूज ते लिंबे जळगाव दरम्यानच्या के टी संगम इन्फ्रास्ट्रक्चर या टोल व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात येते. गेल्या सोळा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त छोट्या पंढरपुरात जाणाऱ्या घोडेगाव ते पंढरपूर या दिंडीचे शनिवारी (ता. 5 जून) रोजी टोल नाक्यावर आगमन होताच टोल व्यवस्थापक संजय सिंग यांनी दिंडीतील भाविकांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी टोल कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
