
वाळुज महानगर, (ता.17) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त आळंदी येथे राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज मठामध्ये भव्य संत संमेलन सोहळा शनिवारी 15 नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी दिनी पार पडला.
या प्रसंगी तुर्काबाद (खराडी) येथील धर्माचार्य हभप जनार्दन मेटे महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला श्रीक्षेत्र सराला बेटाचे महंत स्वामी रामगिरीजी महाराज, महंत यती अमृताश्रम दंडी स्वामी बीड प.पू. माधवदास महाराज राठी, नाशिक प. पू. मारुती महाराज शास्त्री तुनतुने, 
प. पू. माऊली महाराज, भागवताचार्य एकनाथ महाराज राजूरकर, सुनील घनवट यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक साधुसंत, भाविक, भक्त आणि राष्ट्रीय वारकरी परिषदेचे सर्व संत उपस्थित होते.
