
वाळूजमहानगर, (ता.17) – क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नवीन प्रयास बहुऊद्देशिय संस्था आणि वायफोरडी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबिराचे आयोजन रांजणगाव (पोळ) जवळील वसू सायगाव येथे नुकतेच करण्यात आले होते. या शिबिरात जवळजवळ दीडशे जणांनी सहभाग नोंदवला.
वसू सायगाव येथील बाबासाहेब ठोकळ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत दंत तपासणी, डोळ्यांची तपासणी, रक्त तपासणी व प्राथमिक आरोग्य तपासणी करून रुग्णांना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. या शिबिरात महिला, वृद्ध व लहान मुलांनी गावकऱ्यांनी शिबिराचा फायदा करून घेतला. तर वाय फोर डी फाउंडेशन तर्फे गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना हातांची स्वच्छता कशी राखावी. याबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवीन प्रयास बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर, संयम संस्था सातारा व मेहरून बाल विकास प्रेरणा केंद्र जळगाव या संस्थांनी परिश्रम घेतले.
