March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.21) – हरीओम चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते हरीओम घाडगे आणि अभिनेते गौरव कदम यांच्या उपस्थितीत वाळूज येथील आयसीम इंजिनिअरिंग व एमबीए महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे या दोन्ही बंधूंच्या पार्श्वभूमीवर ‘हरीओम’ या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सुरवात औरंगाबाद मधून होणार असल्याने या चित्रपटाबद्दल माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली जाणीव व जागृती यामुळे ते चांगलेच प्रभावी झाले. मुंबईमध्ये आता असे वातावरण पाहण्यास मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. विद्यार्थ्यांनी या दोन्ही अभिनेत्यांशी चित्रपट क्षेत्र आणि अभिनयावर चर्चा केली. गौरव कदम हे मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका जिमचे संचालक आहेत. या जिम मध्ये टायगर श्रॉफ आणि सचिन तेंडुलकर यांचा मुलगा यांनीही प्रशिक्षण घेतले आहे. यावेळी आयसीम कॉलेजचे अध्यक्ष डॉ सुभाष झवर, डॉ.कल्पना झवर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आयसीमचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी. एस. पद्मावत, उपप्राचार्य हेमंत जाधव, विजय काकडे, अवधूत शिंदे यांची उपस्थिती होती. विद्यार्थी संसदेच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने इमारतीवरून वीस फुटाच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कॉलेजचे अध्यक्ष डॉ सुभाष झवर, डॉ कल्पना झवर त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राध्यापक आनंद हुंबे, प्राध्यापक विनोद शिखरे, इतर प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोलताशे, लेझीम याच्या गजरात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर अच्युत भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवजयंती समितीचे अध्यक्ष वैभव ढेरे, भाऊसाहेब मोटे, अन्वय पाटील, योगेश कर्पे, दत्ता कवडे, दिग्विजय मठकरी, प्रशांत जोशी, विकास शेळके, कल्पेश चव्हाण, पल्लवी उंडाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *