March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – आयसीम कॉलेजचा “जलसा” हे कलाकार घडवनारं व्यासपीठ बनलं आहे. असं मत मिस इंडिया नवेली देशमुख हिने व्यक्त केलं. आयसीम इंजिनियरिंग, पाॅलीटेक्निक व एमबीए कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ती प्रमुख पाहुणी म्हणून बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दिलीप सारडा हे होते.

वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (आयसीम) कॉलेजमध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन “जलसा-2 के 24” हा कला-क्रीडा-उत्सव पार पडला. आयसीम कँपस मधे गेले आठ दिवस चाललेल्या या कला-क्रिडा उत्सवात सुमारे शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विविध क्रीडाप्रकार डान्स, सिंगिंग व स्कीट्स आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचा यात समावेश होता. या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी मिस इंडीया तथा महाराष्ट्र शासनाच्या अँबेसिडर ऑफ यूथ टुरिझम नवेली देशमुख तसेच सुप्रसिद्ध गायिका व प्लेबॅक सिंगर संगीता भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती. आयसीम कँपस मधे पार पडलेल्या या सोहळ्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अतिशय सुंदर व्यासपीठ उपलब्ध करुन दिले व उत्तरोत्तर या उत्सवाची व्याप्ती वाढतच जाईल असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मिस इंडीया नवेली देशमुख यांनी काढले.

याप्रसंगी आयसीम कॉलेजचे अध्यक्ष डॉ. सुभाष झवर, सचिव दिलीप सारडा, उपाध्यक्ष रमाकांत पूलकुंडवार, विश्वस्त डाॅ. कल्पना झवर, डाॅ. सचिन झवर, डाॅ. शुभा झवर, कॅम्पस संचालक डॉ. सी. एस. पद्मावत, संचालक डॉ. हेमंत जाधव, विद्यार्थी संसद प्रमुख आनंद हुंबे, विद्यार्थी संसद प्रतिनिधी भाऊसाहेब मोटे, डाॅ. दिपमाला बिरादार, प्रा. सायली राठोड, प्रा. विनोद शिखरे, प्रा. अस्मिता मठकरी, प्रा. मुशाहीद खान, प्रा. शिशिर राठोड, प्रा. जफर हसन, प्रा. पल्लवी काथार, डाॅ रत्नदीप देशमुख, अच्युत भोसले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाखा रुपल यांनी केले तर ‘जलसा’ प्रमुख प्रा. आनंद हुंबे यांनी आभार मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *