
वाळूजमहानगर, ता.13) – शासकीय जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट आणि वाळूज येथील आयसीम इंजिनिअरिंग, पॉलीटेकनिक व एमबीए कॉलेज, यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय तीन दिवसीय रोजगार मेळावा झाला. या मेळाव्याला पस्तीस पेक्षा जास्त कंपन्यांनी उपस्थिती लावून सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातल्या एकशे चौसष्ठ उमेदवाराची निवड केली.

तीन दिवस पार पडलेल्या या रोजगार मेळाव्याचे पहिल्या दिवशी अनुराग कल्याणी, एचआर जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया यांच्या हस्ते उदघाटन झाले. संदीप पिंपळे, एचआर हेड ग्राइंड मास्टर तसेच विजय साळवे मेटलमन, समीर करूरकर हे ट्रूव्हिव वार्नर कंपनी तर्फे उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सुरेश वराडे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते झाले. यावेळी पस्तीस पेक्षा जास्त कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. त्यात बजाज ऑटो ली., युग्मा इम्प्रेशनस, भोगले ऑटोमोटिव्ह, मनू इलेक्ट्रिकल्स, शॉप कार्ड, ट्रान्सडेस्क, पॅरासन मशिनरी, ट्रूव्हिव वार्नर इलेक्ट्रॉनिक्स, जीएसइ रिन्यूएबल्स, लक्ष्मी अग्नी फोर्जींग, युनीलॉक्स अकॅडमी, भाग्यलक्ष्मी रोलिंग, कॅप्रीहॅन्स इंडिया ली., जिब्रा पॉवर सिस्टीम, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, मायक्रोनिक्स, कोंकण ऑटोमेशन, मेटलमॅन, सुदर्शन सोलार, पगारिया ऑटो, इलीजंट कोटींग, औरंगाबाद ऑटो, दिग्विजय ट्रान्स्फाॅर्मर इंडस्ट्रीज, टेस्टी बाईट्स आदी नामांकित कंपन्यांचा समावेश होता. काही कंपन्यांचे इंटरव्यू ऑनलाइन मोडने पार पडले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.मुसाहेद खान, प्रा. शीतल दहाड, डॉ. गौतम सहा यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयसीम कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सी एस पद्मावत, डायरेक्टर डॉ. आर. आर. देशमुख, उपप्राचार्य प्रा. हेमंत जाधव व सर्व विभागप्रमुख यांची उपस्तिती होती. आयसीमचे अद्यक्ष डॉ. सुभाष झवर, उपाध्यक्ष दिलीप सारडा, सचिव डॉ. सचिन झवर यांनी निवड झालेल्या उमेदवारांचे स्वागत केले.
