
लिंबे जळगाव, (ता.26) : जाणाऱ्या आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही अपघाताची घटना मंगळवारी (ता.25) दुपारी जिकठाण फाटा येथे घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आयशर टेम्पो (एम एच 14, डी एम -3577) व दुचाकी (महा 20, डी झेड- 8511) यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार अशोक कचरु पवार (51) रा. कनकोरी (ता.गंगापुर) हे जखमी झाले. मंगळवारी (ता.25) दुपारी जिकठाण फाटा येथे आलेल्या या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमी अशोक पवार यांना उपचारार्थ घाटीत दाखल केले.
या अपघाताच्या घटनेची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.
