वाळूजमहानगर (ता.9) :- फायनान्सचे पुढील हप्ते भरतो व मेंटनन्सही करतो. असे म्हणून आयशर ट्रक चालविण्यास घेवुन गेला व ती परस्पर डिलरला विकुन विश्वासघात केला. ही फसवणुकीची घटना वाळूज येथे मंगळवारी (ता.8) रोजी उघडकीस आल्याने वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बकवाल नगर वाळुज, ता. गंगापूर येथील अमोल ज्ञानदेव चोपडे (वय 22) हा वाळूज येथील बि.एल.जी. कंपणीत काम करतो. त्याने सन 2021 मधील मे महीन्यामध्ये आयशर कंपनीचा ट्रक (क्र.एम एच 04, एफ यु-0799) हा विकत घेतला. त्यावर कोगटा फायनंन्सचे कर्ज होते. जानेवारी 2022 मध्ये कामधंदा नसल्याने ट्रक घरीच उभी होती. त्यावेळी उबळे हा त्याला म्हणाला की, गाडी घरीच उभी आहे. ती कोणाला तरी चालवायला दे, माझ्या ओळखीचा अन्वर मुसा शेख हा असुन तो गाडी चालविण्यास घेईल व कर्जाचा हप्ता भरील. असे म्हणाला. त्यामुळे गाडीचे कर्जाचे हप्ते भरुन मेंन्टन्स वगैरे करायचे असे ठरल्याने अन्वर मुसा शेख रा. बीड बायपास हा गाडी घेवुन गेला व कर्जाचे 3 हप्ते भरले. त्यानंतर त्याने हप्ते वगैरे भरले नाहीत. त्यामुळे त्याला वेळो वेळी संपर्क केला असता तो म्हणायचा की, सध्या गाडीचे काम चालु आहे. नंतर हप्ते भरतो. त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. म्हणुन गाडी कोठे आहे. हे सुद्धा समजले नाही. त्यामुळे गाडीचे फोटो काढुन डिलरला पाठविले असता डिलर सलिम अमरावती म्हणाला की, ही गाडी माझ्या कडे विक्रीसाठी आहे. ती अन्वर मुसा शेख याने मला विकली आहे. असे कळाल्याने अमोल चोपडे यांनी वाळुज पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आरोपी अन्वर मुसा शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहे..