March 23, 2026

वाळुजमहानगर, (ता.11) – नाना नानी पार्किंग समोर झोपलेल्या एका अनोळखी इसमास एका आयशर ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बजाजनगर येथे शुक्रवारी (ता.11) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथे हायटेक कॉलेज ते आम्रपाली बुद्ध विहार दरम्यान नाना नानी पार्क आहे. या पार्कच्या समोर एक अनोळखी इसम झोपला होता. बहुधा तो वेडसर असावा. अशी येथील नागरिक सांगतात. बजाजनगर येथील नाना नानी पार्कच्या समोरील बाजूस अनेक वाहनधारक रस्त्यावरच आपापली वाहने उभी (पार्क) करतात.

अशीच एक आयशर ट्रक एम एच 20, ए टी- 8846) येथे उभी केलेली होती. या आयशर ट्रकचा चालक शुक्रवारी ता अकरा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रक जवळ आला. आणि त्याने ट्रक समोर, पाठीमागे किंवा खाली कोणी आहे की नाही? याची खात्री न करता निष्काळजीपणाने आयशर ट्रक सुरू केला. त्यामुळे या आयशर ट्रक खाली चिरडून त्या अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे, दीपक हिवाळे, राजू चव्हाण, चालक बाळासाहेब देवबोने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला घाटीत दाखल करण्यात आले.

आयशर ट्रक चालक ताब्यात –
दरम्यान या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या अपघातात चिरडून ठार झालेल्या अनोळखी इसमाबाबत बजाजनगर परिसरात चौकशी करण्यात येत असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *