
वाळूज महानगर (ता.6) – महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वयोगट 18 वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा वाशी, मुंबई येथे 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. याकरिता एम.आय.टी विश्वशांती गुरुकुल स्कूल मधून 3 खेळाडूंची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत निवड झाली आहे.
ही निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. त्याकरिता छत्रपती संभाजीनगर विभागीय सचिव सतीश पाठक, उपाध्यक्ष काझी अर्शद, अक्रम काजी यांची उपस्थिती होती. खेळाडूंची नावे शौर्य पाटील, रोशनी नायर, समीक्षा रणवीर, आयडियल ज्युनिअर कॉलेजची रामेश्वरी काळे हे खेळाडू छत्रपती संभाजीनगर विभागाचं प्रतिनिधित्व करणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आदित्य जोशी, क्रीडा शिक्षक जब्बार पठाण, कार्तिक बिरोटे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप गायकवाड, नमिता मार्केडे, विश्वास अंकुश, लवकीक राठोड यानी खेळाडूचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
