March 26, 2026


वाळूज महानगर, ता.1 बातमीदार) – आयडियल इंटरनॅशनल स्कूल, तिसगाव येथे थोर देशभक्त’ बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी’ आणि लोकशाहीर ‘अण्णाभाऊ साठे यांची जयंती’ शनिवारी (ता.1) रोजी साजरी करण्यात आली.

प्रथम यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा जोशी आणि शाळेच्या प्रशासक अनुराधा राजपूत यांनी बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्या राऊत यांनी थोर देशभक्त बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल मुलांना माहिती सांगितली. तसेच काही विद्यार्थींनी आपल्या भाषणातून त्यांचे महत्व व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिश्री पडोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *