March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क योग प्राणायम शिबीर उत्साहात सुरु झाले. सरपंच सुनील काळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात केली. मुबंईचे प्रविण बाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण शनिवारी (ता.25) नोव्हेंबर पासून सुरु झाले असून रोज पहाटे 5:15 ते सकाळी 7:00 यावेळेत घेतले जात आहे. या शिबिराचा समारोप बुधवारी (ता.29) नोव्हेंबर रोजी होईल.

मुंबई येथील योग मार्गदर्शक प्रविण महामुणकर, श्रुती शिंदे, गायत्री शेटे यांनी विविध प्रकारचे योगाचे प्रात्यक्षिके केली. यावेळी योग शिक्षक जनार्दन नवसरे, मोना दिदी, संतोष राजपूत, अंकुश भानुसे, कल्यान तवले, नाना कदम, बाळासाहेब तोडमल, दिलीप सणस, संगीता आवटे यांनी मार्गदर्शन केले. बजाजनगर शिवसेना तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, माजी सरपंच महेश भोंडवे तसेच सिद्धिविनायक गणेश मंदिर, पतंजली योग समिती यांनी या शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान भोंडवे यांनी केले. या जागतिक दर्जाच्या योग प्रशिक्षकांच्या ज्ञानाचा फायदा परिसरातील नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन उद्योजक हनुमान भोंडवे यांनी केले.

या शिबिरास ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लगड, मीनाक्षी भोंडवे, जयश्री घाडगे, बबन सुपेकर, अधिक पाटील, विजय उखळे, मोतीराम चौधरी, विष्णू शिरसाट, गोरख शेळके, आय, जी, जाधव, पंडित नवले, राजेंद्र माने, स्व. भैरोमल तनवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, प्रदिप माळी, रोहित खैरे, विशाल लगड, अर्जुन चेळेकर, रामेश्वर धनायत, राजकुमार गारडे, गणेश भोंडवे, अरुण वाखुरे, पोपट कटके, संजय गव्हाणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *