वाळूजमहानगर (ता.30) – बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आमदार संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क योग प्राणायम शिबीर उत्साहात सुरु झाले. पतंजली योगापीठाचे योगाचार्य महेश पूर्णपात्रे (हरिद्वार प्रशिक्षित) यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण 22 नोव्हेंबर पासून सुरु झाले असून रोज पहाटे साडेपाच ते सकाळी सात यावेळेत घेतले जाते.
बजाजनगर शिवसेना तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, माजी सरपंच महेश भोंडवे तसेच सिद्धिविनायक गणेश मंदिर, पतंजली योग समिती यांनी या शिबिराचे आयोजन केले.
या वेळी आमदार संजय शिरसाट यांचा त्यांच्या परिवारासहित वाढदिवस साजरा करण्यात आला. शिबिरातील उत्साहपूर्ण वातावरण बघून आपण भाराऊन गेल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले व सर्वांचे असेच प्रेम आपल्याला मिळत राहो. अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमान भोंडवे यांनी केले.
या शिबिरास सरपंच सुनिल काळे, उपसरपंच ज्योतीताई साळे, श्रीकांत साळे, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लगड, उषाताई हांडे, पूनमताई भोसले, राणीताई पाटोळे, माधुरीताई सोमासे, विष्णू उगले, मीनाक्षी ताई भोंडवे, जयश्री घाडगे, बबनराव सुपेकर, अधिकराव पाटील, रमेश पाटील,राजेश कसुरे, रवी कसुरे,राजेश साळे, पोपटराव हांडे, संतोष नरोडे, देविदास जाधव, भानुदास राठोड, सचिन प्रधान, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय शहाणे, संपत भांगे, दशरथ मुळे, रमाकांत भांगे, शशिकांत ढमढेरे, राम पाटोळे, प्रकाश भोसले, सुरेश गवळी, वासंती पाटील, रामदास गवळी, राजन सोमासे, गौरव पाटील, सुरेश गाडेकर, श्रीकृष्ण भोळे, विजय उखळे, मोतीराम चौधरी, विष्णू शिरसाट, गोरख शेळके, आय, जी, जाधव, डी. के, राजपूत, पंडित नवले, राजेंद्र माने, रोहित फलके, रोहित खैरे, विशाल लगड, अर्जुन चेळेकर, रामेश्वर धनायत, राजकुमार गारडे, गणेश भोंडवे, मोहन गिरि, अरुण वाखुरे, पोपट कटके, संजय गव्हाणे यांच्यासह. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. योग शिक्षक मोना दिदी, संतोष राजपूत, नवसरे दादा, अंकुश भानुसे, कल्यान तवले, नाना कदम, बाळासाहेब तोडमल, दिलीप सणस, संगीता आवटे यांनी मार्गदर्शन केले.