February 5, 2026

वाळूज महानगर – औरंगाबाद पश्चिमचे आमदार तथा शिंटे गटातील महामेरू आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना सोमवारी (ता.17) सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना प्रथम येथील सिग्मा व नंतर आज सकाळी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरंगाबाद शहराच्या दृष्टिकोनातून ही सर्वात मोठी बातमी असून आमदार संजय शिरसाट यांच्या चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे.

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी सलग तिसरांदा आमदारकी काबीज केली. त्यामुळे त्यांचे या भागासह संपूर्ण जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. गेल्या काही दिवसापासून ते शिंदे गटात सामील झाल्याने ते या गटातील महामेरु समजल्या जाते. सोमवारी (ता.17) रोजी दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना प्रथम येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आज मंगळवारी (ता.18) सकाळीच एयर ॲम्बुलन्सने पुढील उपचारार्थ मुंबई येथील लिलावतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती आमदार संजय शिरसाठ यांच्या निकटवर्तीयांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ही सर्वात मोठी बातमी असून त्यांच्या चाहत्यांना ही बातमी कळताच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक चाहत्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *