वाळूज महानगर, ता.12 : वाळूज येथील घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम सभेत दिलेल्या निवेदनाची दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी घेत हा प्रस्ताव विविध विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवला आहे. त्यामुळे वाळूज येथील घरकुलाचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वाळूज येथील अण्णाभाऊ साठे नगरातील गट क्रमांक 340 येथील नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावे म्हणून आमदार प्रशांत बंब यांच्याकडे आमसभेमध्ये निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच वाळूज परिसरातील बेघर नागरिकांना स्वतःचे घर मिळावे म्हणून गट क्रमांक 361 मध्ये प्रस्ताव तयार करून दोन एकर जागेचा प्रस्ताव सादर केला आहे. तहसीलदार गंगापूर यांच्याकडे सदर प्रस्ताव पाठवला आहे. परंतु तो प्रस्ताव अद्याप कार्यवाही न झाल्यामुळे तोही प्रश्न आम सभेमध्ये बी पॅंथरचे महासचिव भीमराव गाडेकर, जिल्हाध्यक्ष अशोक श्रीखंडे, तालुकाध्यक्ष अमोल वाघमारे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कल्पनाताई सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत बंब यांच्याकडे मार्गी लावण्याचे निवेदन दिले आहे. त्या संदर्भात आमदार प्रशांत बंब यांनी पत्राद्वारे कळविले की, मी आपली समस्या तहसीलदार गंगापूर, गट विकास अधिकारी गंगापूर, उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्याकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावाची आमदार प्रशांत बंब यांनी दखल घेतल्यामुळे वाळूज येथील नागरिकांचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.